चोपडा जिल्हा परिषद शाळेत नवगतांचे स्वागत… सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार !

0
197

चोपडा :- मनात नवी आशा, नवी आकांक्षा… नवी स्वप्ने घेऊन चिमुकल्यांच्या चिवचिवाटासह चोपडा तालुक्यातील वरगव्हाण जि.प.प्रा.शाळा पहिल्याच दिवशी गजबजून गेली. शाळेचा कोपरा न् कोपरा बालकांच्या सहवासाने प्रफुल्लित होऊन गाऊ लागला… “ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा…..!”

fcaa8c4f 34c3 4a82 82bc 84e97da59c12

दरवर्षाप्रमाणे या वर्षीही पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची वाजतगाजत चारचाकी गाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक घोषणांनी परिसर दणाणून गेला. शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकांच्या चेहऱ्यावर शाळा उघडण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मिरवणूकीनंतर शाळेच्या पटांगणात शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मेळाव्यात विविध स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. यात शारीरिक विकास, भाषा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास इ. स्टॉलची मांडणी केली. या मेळाव्यात पहिलीत दाखल होणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्याला शाळेत येण्यापूर्वी शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा पाया घातला जावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असते. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले. पुष्पगुच्छ व पेढे वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

मेळाव्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक केदारेश्वर चव्हाण, पोलीस पाटील गोरख पाटील व अंगणवाडी मदतनीस निर्मला पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा पार पडला. केदारेश्वर चव्हाण यांचा सत्कार नेमिचंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आला. वरगव्हाणचे पोलिस पाटील गोरख पाटील यांचा सत्कार जयसिंग पाटील यांच्या हस्ते तर अंगणवाडी मदतनीस निर्मलाबाई पाटील यांचा सन्मान हाफिजा तडवी यांच्याहस्ते करण्यात आला. सेवापूर्ती निमित्त शाळेच्या वतीने तिन्ही मान्यवरांना विठूरूखमाईची मुर्ती भेट म्हणून देण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सरपंच भुषण पाटील व ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटील, जहांगीर तडवी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने देखील मान्यवरांचा सत्कार केला. सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी देखिल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच नवीन रूजू झालेल्या संदिप निकम यांचे स्वागत करण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळाव्यास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हाफिजा तडवी, उपाध्यक्ष मुजात तडवी, सदस्य लतीब तडवी, दिनेश सोनार, निसार तडवी, संजय तडवी, तय्यब तडवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरीफ तडवी यांनी केले व आभार मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी मानले.

आत्माराम पाटील. एमडीटीव्ही न्युज चोपडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here