निकम यांनी शोधून काढली जमिनीतून पाणी बघण्याची अनोखी पद्धत…

0
469

नाशिक :२५/२/२०२३

भिलकोट तालुका मालेगाव येथील संजय कृष्ण निकम यांनी जमिनीतून पाणी बघण्याची एक अनोखी तऱ्हा शोधून काढली.. ऐकून आणि पाहून थक्क व्हाल!
भडगाव येथील पत्रकार सतीश पाटील यांच्या घरी संजय निकम यांनी भेट दिली.

हातावर नारळ घेऊन जमिनीतले पाणी पाहणी केली.

व त्याचवेळी सांगितलं की जमिनीत फक्त पंधरा ते वीस फुटावर पाणी लागेल .

दुसऱ्या दिवशी टूबेल केल्यावर खरोखर 15 ते 20 फुटांवर पाणी मोठ्या प्रमाणात उसळी घेत होते.

त्यांना या संदर्भातली विद्या लहानपणापासूनच अवगत होती असं म्हटलं जातं.

आतापर्यंत त्यांनी मालेगाव सह जळगाव धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी पाहण्याचा कार्यक्रम केलाय.

त्यांनीही अनोखी पद्धत शोधून काढली परंतु ज्या ठिकाणी ते जातात ना जमिनीचा अंत कोणी पाहू शकत नाही.

ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी हातावरचे नारळ ऑटोमॅटिक उभे राहते त्यांना कोणी स्पर्श केला तरी नारळ पुन्हा खाली येते. ज्या जमिनीत पाणी नाही तिथे नारळ उभे होत नाही.

आणि जिथे नारळ उभे राहिले तिथे पाणी शंभर टक्के असल्याची खात्री त्यांना होते..

आता हा निसर्गाचा चमत्कार म्हणायचा की नेमकं काय..

chunchale
⤵️

हे हि पहा :https://youtu.be/dcuEKr6tWzk

मात्र या अनोख्या पद्धतीतून जमिनीतून पाणी बघण्याची पद्धत सर्वांनाच थक्क करणारी वाटली.

मराठीतील या उक्तीप्रमाणे निसर्गाची करणी आणि नारळ दाखवतो पाणी याप्रमाणे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळते..

आम्ही निश्चितपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही, मात्र ही नेमकी पद्धत काय ही दाखवण्याचा प्रयत्न केला..

यासोबतच हा सगळं प्रकार म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आणि भोळ्या भाबड्या लोकांची आर्थिक लूट करणं .

आणि दैवी चमत्कार अंगात असून समाजाला अंधश्रद्धेच्या आहारी नेणं या प्रकाराला आणि निकम यांना समितीनं आव्हान दिलंय कि सिद्ध करा अन्यथा माफी मागा..

यासंदर्भात नाशिक प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी या बातमीच्या खोलात जाऊन थेट डाॅ.टि.आर.गोराणे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस यांच्याशी संवाद साधला..

आणि गोराणे सरांनी या प्रकारावर प्रकाश टाकलाय .. ऐकू या हा सविस्तर संवाद …

नाशिक प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी साधलेला डॉ गोराणे सरांशी संवाद ..

जादूटोणाविरोधी कायदा अधिक कडक होईल अशी आशा करू या ..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्युज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here