“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा

0
218

तळोदा :- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारचे ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात “मोदी @ 9” घर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे १ जून ते ३० जून या दरम्यान अभियान राबविण्यात येत असून या निमित्ताने विविध उपक्रम, कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे काल रविवारी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रदेश सचिव अजय भोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, नंदुरबार जिल्हा संघटन महामंत्री निलेश माळी, आमदार राजेश पाडवी यांनी संघटनात्मक नियोजनासाठी मार्गदर्शन केले. यावेळेस प्रत्येकाला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्याचबरोबर पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आघाडी, मोर्चा, सेलच्या अध्यक्षांनी आपला संघटनात्मक जबाबदारीचा आढावा दिला. बैठकीला प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र राजपूत, संघटन मंत्री बळीराम पाडवी, नवनियुक्त विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, प्रभारी नारायण ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, शहर मंडल अध्यक्ष योगेश चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष भारती कलाल, रसिलाबेन देसाई, नंदुरबारचे पदाधिकारी भीमसिंग राजपूत, पंचायत समिती उपसभापती, सदस्य, जि.प.सदस्य, शहर प्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार कैलास चौधरी यांनी मानले.

नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज तळोदा ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here