BREAKING – ठाकरे गटाने फोडला बॉम्ब..?मुख्यमंत्री होणार हे.

0
343

मुंबई -१७/६/२३

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय फडणवीस माध्यमांना सांगतात एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं.
मात्र देवेंद्र फडणवीस यांना सरकार पाडायचं एवढंच माहिती होतं
मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं असे ते म्हणाले
शिवसेनेच्या आवाज कोणाचा या पॉडकास्ट मध्ये ते बोलत होते…

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –

“देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. हे सपशेल चुकीचं आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं,” असं नितीन देशमुख म्हणाले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

“…हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं”
“देवेंद्र फडणवीस माध्यमांना सांगतात, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं. मात्र, देवेंद्र फडणवीसांना सरकार पाडायचं, एवढंच माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं,” अशी माहिती नितीन देशमुख यांनी दिली.

“उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना घडवलं”

“आमची ओळखच शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंना ‘मातोश्री’ने घडवलं. जिल्हाप्रमुख, आमदार, कॅबिनेमंत्री आणि मुख्यमंत्रीनंतरचं नगरविकास मंत्रीपद दिलं. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना घडवलं. त्यांच्याशी ते प्रमाणिक राहिले नाहीत. आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेले असतो, तर आमच्याशी किती प्रामाणिक राहिले असते. आमची ओळख फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे,” असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here