एकही आदिवासी राहणार नाही बेघर-आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ..

1
382

नंदुरबार :२४/२/२३

शहादा तालुक्यातील शहादा ,राणीपूर, गणोर ,सुलतानपूर ,मलगाव येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह व शालेय इमारतींच्या पायाभरणी कार्यक्रम संपन्न झालाय.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी भविष्यात आदिवासीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजण्याची माहिती दिली.
आदिवासी विभागामार्फत नवीन नवीन योजना येत असतात. तसेच काही अडचणी आल्यास महाराष्ट्र आदिवासी विभागामार्फत 18002670007 हा टोल फ्री नंबर वर संपर्क केल्यास आपल्याला लागणारी माहिती आपणास देण्यात येईल.

या नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क करू शकतात.
तसेच आपल्याला आवडता व्यवसाय करण्यास आपण इच्छुक असाल तर त्यासाठी लवकर आदिवासी विकास विभागामार्फत लवकरच नवीन अप्स जारी करण्यात येणार आहे.

त्यात आपल्याला कोणती नोकरी करण्याची इच्छा आहे किंवा कोणत्या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण हवे या बाबत माहिती भरल्यास आपल्याला त्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना निधी उपलब्ध केली जाईल.

सदरील अप्स मध्ये आपले शैक्षणिक सर्व माहिती भरता येईल.
आजपर्यंत आपण घरकुल योजना पासून वंचित असाल व ड यादीतही नाव नसेल तर आपण अर्ज करू शकतात

व त्यांना आम्ही दोन वर्षांच्या आत घरकुल मंजूर करून देऊ.महाराष्ट्रातील एकही आदिवासी बेघर राहता कामा नये हाच आमचा उद्देश आहे -असं डॉ .गावितांनीं म्हटलंय.

संजय मोहिते,शहादा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here