न्याहली चे शेतकरी हिंमतराव माळी राहुरी कृषी विद्यापीठाचे आयडॉल

0
148

नंदुरबार :- तालुक्यातील न्याहली येथील आदर्श शेतकरी हिंमतराव माळी यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे “शेतकरी आयडॉल” म्हणून गौरविण्यात आले आहे. भाजीपाला पिकासाठी केलेले विविध प्रयोग व उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

न्याहली येथील “शेतकरी आयडॉल” हिंमतराव बाबुराव माळी यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला लागवड करून संरक्षित तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याचप्रमाणे बाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाल्याच्या विविध पिकांची वर्षभर लागवड करून चांगले उत्पादन घेतले. शेवग्याची ‘शबनम’ नावाची स्थानिक जात विकसित करून विक्री व्यवस्थापनातून बाजारामध्ये ‘हिंमतराव का शेवगा’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष या नात्याने नंदुरबार जिल्ह्यात कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रसार केला. हिंमतराव माळी यांना आतापर्यंत सह्याद्री दूरदर्शन कृषी सन्मान पुरस्कार २००९, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी समाजभूषण पुरस्कार २०१०, कृषी विभाग आत्मा अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार २०१३, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१७, आणि मनुष्यबळ विकास संस्थेच्या कृषी रत्न पुरस्कार २०१९ अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने नुकताच त्यांचा “शेतकरी आयडॉल” म्हणून गौरव केल्यामुळे त्यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here