12th and 10th board exams – राज्यात फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का? परीक्षा वेळेवर होणार का? असे खूप प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक दहावी बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. वर्षानुवर्षे अडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यासारख्या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्या आहेत, शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा शिक्षा संस्थाचालकांचा आरोप आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही. थकलेले अनुदान देत नाही, तोवर आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांसाठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही, परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर वेगळच संकट येण्याची शक्यता आहे.
सरकारने बळजबरीने आमच्या शाळा अधिगृहीत करून परीक्षा केंद्र उभारण्याचे प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना कुलूप लावू. मात्र आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
या संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला माहिती दिली. शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या काय आहेत ? राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही.ती ताबडतोब करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे (2004 ते 2013 पर्यंतचे) प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी. परीक्षांच्या तारखा काय ? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024 ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित केल्या जातील.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सारीका गायकवाड