आक्षेपार्ह स्टेटस भोवले… नंदुरबारात एकावर कारवाई !

0
1887

नंदुरबार : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने नंदुरबार शहरातील एका युवकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. कोणाच्याही भावना दुखावतील असे स्टेट्स ठेऊ नये, तसे केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी या आधीच दिला आहे. तरी देखील युवकाने असे स्टेट्स ठेवल्याने त्याच्याविरोधात नंदुरबार पोलिसांनी कारवाई केली आहे.

सोशल मीडियावरुन काही लोक सार्वजनिक शांतता भंग होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट, लेख लिहुन खोडसाळपणा करतात. म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजीक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सऍ़प) प्रसारित करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? याबाबत खात्री करुन मगच ती प्रसारित करण्याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियमनुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील तसेच सायबर सेल नंदुरबार यांचेकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

असे स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करुन सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.

हे सुध्दा वाचा:

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सऍ़प या सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व सार्वजनिक शांतता भंग करणारे स्टेटस ठेवून ते प्रसारीत केले होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदरची माहिती सांगून संशयीतास तात्काळ ताब्यात घेवून त्याचेवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.कळमकर व त्यांच्या पथकाने भोणे फाटा भागातील आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून त्याचेविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन त्याचेविरुध्द् कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:

महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS

जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये, तसे आढळून आल्यास संबंधीतांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारीत करण्याचे दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी केले आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here