राजस्थानी युवती व महिलांच्यावतीने गणगोर विसर्जन शोभायात्रा संपन्न..

0
150

अकोला : २८/३/२३

अकोला मूर्तिजापूर येथील राजस्थानी समाजामध्ये गणगोर उत्सव चे युवती व महिला मोठ्या भक्ती भावपूर्वक या सणाचे आणि व्रताचे पालन करतात.

मार्च एप्रिल या कालखंडामध्ये शिवपार्वती चे पूजन केले जाते. विवाहित महिला पतीच्या सुखासाठी, सौभाग्यासाठी, समृद्धीसाठी, आणि संततीच्या सुखासाठी तर कुमारीका आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून गणगोर पूजन करतात.

होळी नंतर लगेच या व्रताची सुरुवात होऊन बहुतांश घरात 16 दिवस हा सतत उत्सव चालतो.

गणगौर चे आकर्षण म्हणजे मेहंदी. विशेषतः हातापायावर मेंहदीचे विविध आकाराची नक्षी काढली जाते.

राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पासून सुरु होणाऱ्या चैत्र महिन्यात गनगोर बसवितात.

होळीच्या राखेचे आणि शेणाचे मुटके तयार करतात. भिंतीवर सोळा हळद आणि कुंकू च्या टिकल्या काढल्या जातात

आणि नंतर त्यांचे गौरीचे प्रतीक म्हणून पूजन केल्या जाते. गव्हाच्या ओंब्या, हळद यांनी पूजा करतात

.ज्वारीच्या कंणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्याजवळ ते ठेवून त्याला शंकर मानले जाते आणि एका कंसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधतात

हे गौरीचे प्रतीक मानले जाते.या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचे नैवेद्य दाखवतात नंतर सातव्या दिवशी मिरवणूक काढून त्यांना पैसे ,गुळ, तेल या छोट्या भेटींचे स्वरूपात दिल्या जाते

आणि विसर्जनाच्या दिवशी हेच गौरी विसर्जन करून त्या उत्सवाची सांगता करून मिष्ठान्न वाटप करून आनंद घेतला जातो.
मूर्तिजापूर येथील राजस्थानी समाजातील अग्रवाल, माहेश्वरी, ब्राह्मण, सोनार या समाजाची विविध प्रकारे गणगोर शोभायात्रा काढण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

सदर शोभा यात्रेमध्ये समाजातील सर्व महिला व युवतींचा सहभाग होता. शहरातील विविध मार्गाने शोभायात्राचे मार्गक्रमण होत बियानी जिन मध्ये शोभायात्राचे समारोपण करण्यात आले .सदर शोभायात्रा मध्ये,ललित टी कॉफी कॅफे मित्र परिवार तर्फे आईस्क्रीम आणि शीतपेय चे वाटप करण्यात आले.

अशोक भाकरे,प्रतिनिधी अकोला,एम.डी.टी.व्ही.न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here