नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील पोरंबी येथे पुतणीसोबत कोर्ट मॅरेज केल्याच्या कारणावरुन एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील पारंबी येथील केवलराम हिरामण वळवी व रोहिदास उखड्या लोहार यांच्यात जुन्या वादातून भांडण झाले. या कारणावरुन केवलराम वळवी यांना रोहिदास उखड्या लोहार यास दगडाने डोक्यावर मारहाण केली. अजय लोहार याने काठीने डाव्या पायावर मारहाण केली. तसेच कमलेश लोहार, गोपाल लोहार, व प्रकाश लोहार यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तर कावेली रोहिदास लोहार हिने केवलराम वळवी यांच्या पत्नीला घरातून घेवून गेली. याबाबत केवलराम वळवी यांच्या फिर्यादीरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.