नंदुरबार : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर महुपाडा फाट्याजवळ भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथील नानाजी सोमनाथ भोई हे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने पायी जात होते. यावेळी एका भरधाव वेगातील दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून महुपाडा फाट्याजवळ पायी जाणाऱ्या नानाजी भोई यांना धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने नानाजी भोई यांचा मृत्यू झाला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबब मिलींद नानाजी भोई यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार