नंदुरबारात कौटूंबिक वादातून एकाचा खून

1
2384
one-killed-in-nandurbar-due-to-family-dispute

संशयित स्वताहून पोलिसात हजर

शहरात शांतता : नागरिकांनी अफवांना बळी पडू नये – पोलीस अधिक्षकांचे आवाहन

नंदुरबार : शहरात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एकाचा गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे. खुनात बंदुकीचा वापर करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र, कौटूंबिक वादातून ही घटना झाल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

या प्रकरणी संशयित स्वतः च पोलिस ठाण्यात हजर झाला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज रविवारी (दिनांक ९ ) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४०) यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडली.

यावेळी बंदुकीचाही वापर करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटनेचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, कौटूंबिक वादातून ही घटना घडल्याची शहरात चर्चा आहे. घटना घडताच संशयित स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मयत व्यक्तीचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पेालीस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींनी भेट देवून पाहणी केली. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शांतता आहे.

सदर घटना ही व्यक्तीगत वादातून झाली आहे. शहरात सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

नंदुरबार हुन एमडीटीव्ही न्यूज ब्युरो

1 COMMENT

  1. बातमीची सत्यासत्यता पडताळून वाचकां पर्यंत पोहोचवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here