शिंदखेडा : १४/३/२०२३
येथील पंचायत समिती आवारात आजपासून राज्यव्यापी कर्मचारी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय समन्वय समितीच्या सुकाणु समितीत आमची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सर्व संवर्गीय संघटनांनी घेतलेल्या निर्णयानुसार संपत सहभागी झाले .. आजपासून शिंदखेडा तालुक्यातील सर्व कर्मचारी २००५ नंतर कार्यरत कर्मचारायांना १९८२ नुसार जुनी पेन्शन योजना लागू करणे व बक्षी समिती खंड -२ अहवालात वेतन त्रटी बाबत दुर्लक्ष केलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्याय या दोन प्रमुख मागण्या व अन्य प्रलंबीत मागण्यांसाठी सर्व संवर्गीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर बसले आहेत. .
तत्पूर्वी शिंदखेडा पंचायत समिती गटविकास अधिकारी देविदास देवरे व पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
शिंदखेडा तालुक्यातील सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे .
बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करित नाहीत तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाहीत असा पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे .
संपात शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत.
ह्यावेळी शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा नेते गिरीश बागुल, तालुकाध्यक्ष बापू आखडमल, प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तालुकाध्यक्ष लालसिंग गिरासे, प्रहार शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष नितीन सासके, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष धिरज परदेशी, माध्यमिक शिक्षक तालुकाध्यक्ष नरेंद्र भामरे, ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष प्रफुल्ल शिंदे, शिक्षक समन्वय समिती तालुकाध्यक्ष गोकुळ सोनार, मागासवर्गीय संघटना तालुकाध्यक्ष संजय बैसाणे, पुरोगामी शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष गौतम बाविस्कर, जुनी पेन्शन संघटना तालुकाध्यक्ष रणजित राठोड, कास्टाइब शिक्षक संघटना नरेंद्र चौधरी, शिक्षक महासंघ तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, जिल्हा परिषद लिपीक वर्गीस तालुकाध्यक्ष प्रविण कुमावत , चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना त्रंबक शिंदे, आरोग्य कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष पंकज चौधरी, पशु कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष दिलीप लोखंडे, कास्टाईब कर्मचारी संघटना रवींद्र आखाडे, जिल्हा परिषद लेखा संघटना तालुकाध्यक्ष हर्षल खैरनार आदींसह पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी बेमुदत संपावर शिक्षक व कर्मचारी बांधवांना राष्ट्रीय मुलवासी बहुजन कर्मचारी संघटना व प्रोट्रान या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सूनिल थोरात यांच्या वतीने पाठिंबा दर्शवित तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज