नंदुरबार :८/३/२०२३
8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून बाल विवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, तसेच कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांसंबंधी घडणाऱ्या इतर घटनांना आळा घालण्यासाठी “ऑपरेशन अक्षता” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते शुभारंभ नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पटांगणात करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ” ऑपरेशन अक्षता ” या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी, उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करतांना, “ऑपरेशन अक्षता” हा नवीन उपक्रम असुन समाजोपयोगी आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार व आशा वर्कर यांची भुमिका महत्वाची आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “ऑपरेशन अक्षता” या मध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवुन गावात बाल विवाह प्रतिबंध जनजागृती करुन या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करुन त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं .
बाल विवाह रोखणे ही समाज घटकातील प्रत्येकाची जबाबदारी असून गुन्ह्याच्या दृष्टीने विचार केला असता पोलीस अधिकारी म्हणून बाल विवाह रोखणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे.
वरील सर्व बाबींचा सांगोपांग विचार करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने ” ऑपरेशन अक्षता ” सुरु करीत आहोत.
बाल विवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली यांच्या हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, लैंगिक गुन्ह्यांच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत देखील या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
तसेच जिल्ह्यात घडणारा प्रत्येक बाल विवाह रोखला जावून शेवटच्या घटकापर्यंत बाल विवाह विरोधी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार . पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, प्रमोद पवार, अति.मुख्य कार्य.अधिकारी, नंदुरबार, निता देसाई, बाल कल्याण समिती अध्यक्षा, गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,कृष्णा राठोड महिला व बाल विकास अधिकारी, डॉ. तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज प्रतिनिधी नंदुरबार.