31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन..

0
137

नंदुरबार: २९/३/२०२३

हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळण्यासाठी मुंबई येथे 31 मार्च,2023 रोजी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार व तृतीय 15 हजारांचे बक्षीस देण्यात येईल.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता हातमाग कापडाचे नमूने प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोट हाऊस, 5 वा मजला, 128- ब पुना स्ट्रीट मस्जीद (पूर्व) 400009 Email- rddtextiles3mumbai@rediffmail.com दूरध्वनी क्रमांक 022-23700611 या कार्यालयात 31 मार्च,2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पाठवावेत.

नमुन्यावर संपूर्ण नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धागेचा प्रकार, डिझाईन, रंग व कापडाची विशेषात: अशा प्रकार कापडाचे विवरण किंमतीसही देणे आवश्यक राहील.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

वेळेनंतर आलेले नमुने स्विकारले जाणार नाही. विभागीय हातमाग कापड स्पर्धां प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, येथे 31 मार्च,2023 रोजी दूपारी 1 वाजता होईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी यास्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रवीण चव्हाण ,प्रतिनिधी,नंदुरबार एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here