पाचोरा बाजार समितीत १८ जागांसाठी ९८ . २२ टक्के मतदान..

0
203

३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

पाचोरा /भडगांव -२९/४/२०२३

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची नाळ असलेल्या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pachora Bazar Committee) पंचवार्षिक निवडणूकीत (Election) २३१ नामनिर्देशन पत्रापैकी २० एप्रिल या माघारीच्या अखेरच्या दिवशी १६९ उमेदवारांनी माघार घेतल्याने ६२ उमेदवार (candidates) रिंगणात असुन निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले ..
भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तिरंगी लढतीत चुरशीचे व विक्रमी मतदान झाले.
या निवडणुकीत ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकुण ९८ . २२ टक्के मतदान झाले असुन भरघोस मतदान झाल्यामुळे तिनही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसुन आले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांची मतदान प्रक्रिया ही शहरातील गो. से. हायस्कुल येथे एकाच ठिकाणी करण्यात आली होती. सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
त्यात पाचोरा – भडगाव तालूके मिळुन १५३४ मतदान पैकी १५०५ मतदान झाले. ग्रामपंचायत मतदार संघांच्या ४ जागांसाठी १२ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत.
त्यात १२६८ मतदानापैकी १२४४ मतदान झाले. व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात असुन यात २७३ मतदारांपैकी २६४ यांनी मतदान केले.
तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडून रिंगणात असुन यात २७२ मतदानापैकी २६५ मतदान झाले.
पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी शिंदे सेनेत भाजपाचे दोन, महाविकास आघाडीत व भाजपाचे स्वतंत्र पॅनल अशा तीन पॅनलमधे अतिशय चुरशीची लढत झालेली आहे.
निवडणूकीत गेल्या आठ दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची सलगी होवुन राष्ट्रवादी काँग्रेस – ७, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – ६, राष्ट्रीय काॅंग्रेस – २ व व्यापारी मतदार संघातुन – २ व हमाल मापाडी मतदार संघातुन – १ असे १८ उमेदवार रिंगणात होते ..
आमदार किशोर, माजी आमदार दिलीप व वैशाली सुर्यवंशी आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तीन पॅनल तयार करून आप – आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ३.११ टक्के, दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत १६.५० टक्के मात्र दुपारी बारा वाजेनंतर महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी निघाल्याने बारा ते दोन वाजेपर्यंत ५१.८५ टक्के मतदान तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत विक्रमी ९८.२२ टक्के मतदान झाले
दुपारी २.०० ते २.१० पर्यंत दहा मिनिटं जोरदार पाऊस झाल्याने मतदार व उमेदवारांची पळापळ झाली होती.
श्री. गो. से. हायस्कूल या एकमेव मतदार केंद्राबाहेर आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी,प्रतापराव पाटील, पूनम पाटील, अमोल शिंदे, सतिष शिंदे हे ठिय्या मांडून बसले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी, सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांनी काम पहिले
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या बाजार समितीतील निवडणुकीत ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन ३० एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सतीश पाटील,भडगाव तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here