कापसाला हमीभावासाठी पाचोर्‍यात एल्गार ,पालकमंत्र्यांना विचारला जाब ..

0
279

पाचोरा -२९/४/२०२३

गेल्या अनेक दिवसांपासून खानदेशाचे नगदी पीक कापूस घरात पडून आहे
गेल्यावर्षी 14 ते 15 हजार रुपये विकला जाणारा कापूस यावर्षी सात साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे
यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती मोठी दयनीय झालीय ..
शेती व्यवसायात संपूर्ण मंदीचे वातावरण तयार झाले आहे

1
2

त्यावर उपजीविका करणारा मजूर देखील संकटात आले आहेत
रासायनिक खते ,बी बियाणे महाग होत असताना शेतमालाला भाव का नाही असा प्रश्न शेतकऱयांना पडलाय ..
शेतकरी संघटनेतर्फे व जगा व जगू द्या या नागरी मंचातर्फे मोठे जन आंदोलन पाचोरा येथे करण्यात आले .
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले
कापूस भावाबद्दल निळकंठ पाटील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली..
तरीही कोणीही महाराष्ट्र सरकारचे मंत्री आमदार ,खासदार याकडे लक्ष देण्यास तयार नाही मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका निमित्त प्रचाराला तालुक्यात हजर झाले असता शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जाब विचारला ..

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here