Palghar News Marathi : पालघर जिल्ह्यात विकासकामांची गती वाढली – पालकमंत्री रविंद्र चव्हाण..!

0
98
Palghar News Marathi Development works have accelerated
पालघर ( Palghar ) जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळाली आहे. या कामांमध्ये रस्ते, आरोग्य सुविधा आणि गोबरधन प्रकल्पाचा समावेश आहे.

Palghar News Marathi :  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी बरीच रस्ते विकासाची कामे पुर्ण झाली आहेत. पालघर जिल्ह्या सोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये विकास कामे सुरू असून गतीमान व पारदर्शक पध्दतीने  राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे  प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

जिल्ह्यातील विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Ravindra Chavan

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील तसेच लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा कुपोषण मुक्त झाला पाहिजे या दृष्टीकोणातून जिल्हा प्रशासन काम करत आहे. जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा नागरीकांना उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टीने देखील जिल्हा प्रशासन काम करत आहे. हे सर्व कामे करत असतांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे जिल्ह्यामध्ये बालविवाहाची संख्या कमी झाली आहे. बालविवाह नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य रित्या काम करत असून येत्या काळामध्ये पालघर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा होईल. एन.जी.ओ. तसेच इतर संस्थांनी बालविवाह व कुपोषणाची समस्या रोखण्यासाठी एकत्र येऊन काम करावे यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून  येत्या काळामध्ये पालघर जिल्हा आरोग्य सेवेबाबत स्वयंपर्ण जिल्हा होईल असा विश्वास पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.( Palghar News Marathi )

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Palghar News Marathi Development works have accelerated

पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे :

सा. बां. विभागाअंतर्गत असलेली कामे : विक्रमगड मलवाडा रस्त्याची सुधारणा करणे, वाडा मलवाड़ा साखरे जव्हार गोरठण पोयशेत चालतवड खेबाळा राज्य मार्ग क्र. 34 अ रस्ते सुधारणा करणे, वाडा मलवाडा साखरे जव्हार गोरठण पोयशेत चालतवड खेवाळा राज्य मार्ग क्र. 34 अ रस्ते सुधारणा करणे, डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबक रस्ता विशेष दुरूस्ती करणे मोखाडा बोटाशी आडोशी डोलारा रस्त्याची सुधारणा करणे (आभासी पध्दतीने भूमीपुजन)

Palghar News Marathi Development works have accelerated Ravindra Chavan

आरोग्य विभागा अंतर्गत असलेली कामे :अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व औषध भांडार, प्राथमिक आरोग्य केंद्र तिलोंडा, प्राथमिक आरोग्य केंद्र आयरे, प्राथमिक आरोग्य केंद्र थेरोंडा, मोखाडा येथील बी. पी.एच.यु. इमारत ता. मोखाडा (आभासी पद्धतीने उद्घाटन) ( Palghar News Marathi )

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद अंतर्गत असलेली कामे : बलद्याचा पाडा ते कटोळी रस्ता ता. भोरवाड़ा,  प्रजिमा क्र. 40 ते इंदगाव ते वाडा रस्ता ता. विक्रमगड, प्रजिमा क्र. 40 ते खोस्ते बस्ते रस्ता ता. विक्रमगड, रा.मा. 76 ते कशिवली रस्ता विक्रमगड, पिक कुकडदेवी ते कुकड देवीपाडा रस्ता ता. वाड़ा, रा.मा. 77 ते आरवाडा जोडरस्ता ता. वाडा, दिनकरपाडा विशेपाड़ा जोडरस्तास ता. वाडा, रामा 76 ते घोनसई रस्ता ता. वाडा, रामा 34 ते खरीवली प्रजिमा 43 रस्ता ता. वाड़ा (आभासी पद्धतीने उद्घाटन)

सा.बां. विभागाअंतर्गत असलेली कामे : मनोर ते राज्य मार्ग क्र. 48 रस्ता रा.क्र. 73 कि.मी. 800 मीटर रस्त्याची सुधारणा करणे

आरोग्य विभागाअंतर्गत असलेली कामे : ग्रामिण रुग्णालय खानिवडे ता. वसई जि. पालघर येथील मुख्य इमारतीचे बांधकाम करणे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परीषदेअंतर्गत असलेली कामे : मथाणे एडवण रस्ता तयार करणे, प्रत्यक्ष जागेवर उद्घाटन, आगरवाडी ते नगावे रस्ता ता. जि. पालघर, रा.मा. 74 ते गुंदले करवाळे रस्ता, चिंतुपाडा ते दासगाव रस्ता, वाकसई दर्भेपाडा जोडरस्ता, इजिमा क्र. 66 ते तारापूर घिवली रस्ता (आभासी पद्धतीने उद्घाटन) ( Palghar News Marathi )

जिल्हा परीषद बांधकाम विभाग, पालघर अंतर्गत असलेली कामे : मौजे माकुणसार येथील गोबरधन प्रकल्पाचे लोकार्पण.

पालघर प्रतिनिधी ऋषीकेश जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here