नंदुरबार : – पुणे येथून नंदुरबारकडे येत असताना प्रवाशांनी भरगच्च भरलेली बस साक्री ते निजामपूर दरम्यान नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाचे वातावरण असताना बराचवेळ मुलाबाळांसह सामानाचे ओझे सोबत घेऊन रस्त्यावर दुसऱ्या बसची प्रतीक्षेत महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नंदुरबार आगाराची नंदुरबार – पुणे ( एमएच १४ – बीटी २३२९) ही बस दुपारी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास परतीच्या वेळी साक्रीतून नंदुरबारकडे निघाली. बस भरगच्च भरल्याने व शेवाळी फाटा (साक्री ) ते नंदुरबार या रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता खोदून ठेवल्याने मधेच बसचे पाटा तुटले. यामुळे बस नादुरुस्त झाल्याने चालक व वाहकाने बस रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशाना खाली उतरवले. तसेच मिळेल त्या वाहनाने निघून जा, जी बस येईल त्यात बसा असा सल्ल्ला दिला.
मात्र प्रवाशानी दुसरी बस मागवून आम्हाला त्यात रवाना करा, अशी मागणी चालक व वाहकाकडे केली. मात्र ही शेवटची बस नाही, या रस्ताने नंदुरबारकडे जाणाऱ्या बसने आपण जावे, असे त्यांनी सांगितले. मात्र या बसमध्ये ५० हुन अधिक प्रवाशी होते. तर अनेक महिलांकडे लहान बाळ तसेच सामानाचे ओझे होते. त्यामुळे त्यांना मोठा समस्यांचा सामना करावा लागत होता. साक्री कडून येणाऱ्या बसमध्ये बसण्यासाठी रस्त्यावरील लोक गर्दी करीत असल्याने महिलांना तेथेच ताटकळत उभे राहावे लागले. याठिकाणी पाण्याची व इतर कोणतीच सोय नसल्याने लहान मुलांचे हाल झाल्याचे दिसून आले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार