तळोदा,नंदुरबार:१४/०२/२०२३
तळोदा तालुक्यातील सोमावल व बोरद या गावी नुकताच ‘जागरूक पालक तर सुदृढ पालक मोहीम आणि महाआरोग्य शिबिराचे’ उद्घाटन करण्यात आलं.
बोरद येथील शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं. बोरद येथील जिल्हा परिषद शाळेत जागृत पालक तर सुदृढ बालक मोहिमेचे राज्यस्तरीय झूम मीटिंग द्वारे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केलं. शून्य ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य मुला मुलींची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. एकूण 679 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली.
बोरद येथील महामेळाव्यात डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी या मोहिमेविषयी विस्तृत माहिती कथन केली. कार्यक्षेत्रातील गरोदर माता स्तनदा माता व गरजू रुग्णांनी आरोग्य विषयक योजनांचा लाभ या महा आरोग्य शिबिरातून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्यासह डॉक्टर प्रशांत पवार डॉक्टर अरुण लांडगे डॉक्टर स्वाती पावरा डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर राकेश पावरा डॉक्टर विशाल चौधरी डॉक्टर तुषार पटेल डॉक्टर माधुरी पाटील डॉक्टर इमरान शेख, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, गटप्रवर्तक यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
महेंद्र सूर्यवंशी,तळोदा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज..