जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक संपन्न …

0
159

नंदुरबार -५/४/२३

दिनांक 05 एप्रिल रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली.

त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे तसेच इतर अधिकारी व नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य हजर होते. शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी आपले मते मांडून घडलेल्या घटनेचा निषेध केला.
काही समाजकंटकांकडून घडविण्यात आलेल्या या जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वा खाली नंदुरबार शहरात रुटमार्च घेण्यात आला.

पोलीस दलाकडून घेण्यात आलेल्या रुटमार्चमुळे सामान्य नागरिकात विश्वास निर्माण झाला.

5423
नंदुरबार शहरात काल उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने काढला शहरातून शांततेचं आवाहन करणारा रूट मार्च ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

घेण्यात आलेल्या रूटमार्च करीता 09 अधिकारी, 80 अंमलदार व 10 होमगार्ड हजर होते.

नंदुरबार शहरात घडलेल्या अप्रिय जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी शांतता राखावी.

पोलीस दलाचे सोशल मिडीया सेल अफवा पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

गुन्ह्यात सहभाग नसलेल्या कोणत्याही निष्पाप नागरिकास वेठीस धरले जाणार नाही.

तर सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी निर्भय पणे त्यांचे दैनंदिन काम करावे. जातीय हिंसाचाराची पार्श्वभूमी असलेल्या नंदुरबार शहरात काल घडलेली घटना 30 मीटर पेक्षा जास्त अंतरा बाहेर पसरू न देण्यास पोलीस दल यशस्वी ठरले आहे.

प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here