उपराष्ट्रपतींसमोर केलेल्या ‘त्या’ कृतीने जया बच्चन यांच्यावर संतापले लोक…

0
159

दिल्ली:१२ फेब्रुवारी २०२३

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्या आपल्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतात.

जया बच्चन नेहमीच कॅमेऱ्यासमोर राग व्यक्त करताना दिसून येतात. कित्येकदा राज्यसभेतसुद्धा त्या रागावलेल्या दिसून येतात. त्यांच्या या रागीट स्वभावामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका होत असते. सध्या जया बच्चन यांचा राज्यसभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे जया बच्चन यांच्यावर नेटकरी संतापलेले दिसून येत आहेत.

जया बच्चन या हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहेत. आपल्या सिने कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. सध्या चित्रपटांपासून दूर असणाऱ्या जया बच्चन आता राजकारणात सक्रिय आहेत. जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. 

जया बच्चन राज्यसभेतसुद्धा अनेकदा आपलं रोखठोक मत मांडताना दिसून येतात. दरम्यान सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या उपराष्ट्र्पतींकडे बोट करुन बोलताना दिसत आहेत.

या पहा राज्यसभेच्या खासदार जया बच्चन …आणि त्यांची ‘ हि ” अशोभनीय कृती …

जया बच्चन यांचं हे वागणं आता नेटकऱ्यांना खटकल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर नेटकरी जया बच्चन यांच्यावर रोष व्यक्त करत सडकून टीका करत आहेत.

या व्हिडीओमुळे जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन नेहमीप्रमाणेचे रागावलेल्या दिसत आहेत. रागातच त्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतींकडे बोट करत संभाषण करत आहेत. त्यामुळे त्या पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

या बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहलंय, ‘इतका राग बरा नव्हे’. तर दुसऱ्याने लिहलंय, ‘यांनी तर आता सर्व मर्यादाच ओलांडल्या’. तर एकाने थेट जया बच्चन यांना ५० वर्षे सहन केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्या अशी मिश्किल कमेंट केलीय.

दिल्लीहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here