मुंबई -१/५/२०२३
आज एक मे पासून महाराष्ट्र सरकार नवीन वाळू धोरण अमलात आणणार आहे
नागरिकांना स्वस्त दराने वाळू रेती मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केला आहे
आता या नवीन धोरणानुसार बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे
सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास किंवा 133 रुपये प्रति मॅट्रिक टन इतक्या दराने वाळू मिळणार आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
महाराष्ट्र सरकारच्या आधीच्या वाळू धोरणानुसार राज्यात वाळू घाटाचे लिलाव होत असत. पण हे लिलाव वेळेवर होत नसल्याने राज्यात वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा.. दुसरीकडे बांधकाम मात्र थांबलेली नसायची.. आता मात्र नवीन वाळू धोरणानुसार वाळू घाटाची लिलाव बंद होणार आहेत..
नवीन धोरणानुसार वाळू मागणीची प्रक्रिया –
ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे त्यांना महा खनिज https://mahakhanij.maharashtra.gov.in
या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक राहील.. ज्यांना हे शक्य नाही त्यांना सेतू केंद्रमार्फत ही मागणी नोंद करावी लागेल.. यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 मॅट्रिक टन वाळू मिळेल.. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकच करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू विक्रीसाठी ग्राहकाचा आधार क्रमांक आवश्यक राहील.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, मुंबई