PhD Exam : पुणे विद्यापीठात फेब्रुवारीत मध्ये होणार पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा…!

0
145
phd-exam--in-pune-university-in-february

PhD Exam – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाची वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी केली जात होती. त्यानुसार, पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी. प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठातर्फे नोव्हेंबर 2022 मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पूर्व परीक्षा 2024 फेब्रुवारी महिनाअखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.

पीएच.डी.साठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी तयारीसाठी आता खूप कमी कालावधी उरला आहे.

सारिका गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here