धुळे -११/६/२३
अवैध मद्य वाहतूक करून गुजरात राज्यात विक्रीस जाण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोपनीय माहितीवरून पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई केली
देशी-विदेशी कंपनीच्या मद्य साठा व वाहन जप्त करून कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो, धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान अवैद्य धंदेबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समुळ उच्चाटन करणे बाबत विशेष सुचना दिल्या होत्या.
काल दिनांक ०९/०६/२०२३ रोजी रात्रीचे ८.३० वा. सुमारास आंतरराज्य सिमा भागात पेट्रोलींग सुरु असतांना सपोनि /सचिन साळुंखे, यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली
अवेध रित्या दारूची तस्करी होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टापसह पेट्रोलींग करीत असताना नवापुर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत संशयीत वाहनास थांबविणेचा प्रयत्न केला
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
चालकाने काही अंतरावर वाहन थांबवुन जंगल परिसरात अंधाराचा फायदा घेवून जंगल परिसरात वाहन सोडुन पळून गेला
सदर वाहनात गोपनीय बातमी प्रमाणे अवैध मद्य साठा दिसून आला.
सदर मद्यसाठा हा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करुन घेऊन जात असले बाबत मिळून आले आहे. सदर मुददेमालाची व वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे असा एकूण ११,७२,२००/-रु. एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे सुध्दा वाचा:
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
त्याबाबत पिपळनेर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ०१४५ / २०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड , अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली ..
या पथकात सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पोसई , भाईदास मालचे असई ,लक्ष्मण गवळी, पोहेकॉ ,कांतिलाल अहिरे, पोहेकॉ प्रकाश सोनवणे, पोका राकेश,पोकों संदीप पावरा, पोकों पंकज माळी, पोकों कैलास कोळी, पोका विजयकुमार पाटील, पोकों रविंद्र सुर्यवंशी पोकों पंकज वाघ, पोकों नरेंद्र परदेशी आदींचा समावेश होता
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी..