पिंपरी चिंचवड हादरलं ! जमीन खोदण्याचा टिकावान केली पती पत्नीची निर्घृण हत्या …

0
159

पिंपरी चिंचवड,पुणे : दि.१२/०२/२०२३

मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत पसरत असताना पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. 

जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीच आरोपीला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

नेमकी काय हि घटना ?

पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या सुमारास जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. शहरातील दापोडी परिसरात ही घटना घडली.

या घटनेत 61 वर्षीय शंकर नारायण काटे आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला. 45 वर्षीय आरोपी प्रमोद मगरुडकर खून करून मयत दाम्पत्याच्या रक्ताने माखला होता.

तो स्वतःही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन रस्त्याने फिरत असताना नागरिकांनी त्याला पकडले आणि घटनेबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

पुणेहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो.पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here