माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. रतनलाल कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रतनलाल कटारिया यांच्या निधनानंतर हरियाणात शोककळा पसरली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रतनलाल कटारिया यांना तिसऱ्यांदा अंबाला मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. अनुभव आणि जुना चेहरा यामुळे भाजपने कटारिया यांना अंबाला लोकसभा राखीव जागेवरून उमेदवारी दिली. एकाच जागेवरून राज्यसभेच्या खासदार कुमारी सेलजा यांच्याकडून त्यांचा सलग दोनदा पराभव झाला. तरी २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी विजयाचा विक्रम केला. १९९९ मध्येही ते याच जागेवरून खासदार राहिले आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
२०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजकुमार वाल्मिकी यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी कुमारी सेलजा यांना हरवून जुन्या पराभवाचा बदलाही घेतला होता. प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि निष्कलंक प्रतिमेमुळे रतनलाल कटारिया यांना पक्षाने तिकीट दिले. रतनलाल कटारिया यांना १९८० मध्ये बीजेवायएमचे राज्य उपाध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर जून २००१ ते सप्टेंबर २००३ या कालावधीत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, राज्यमंत्री, अनुसूचित जाती मोर्चाचे अखिल भारतीय सरचिटणीस, भाजपचे राष्ट्रीय मंत्री असा प्रवास करून त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. १९८७-९० मध्ये ते राज्य सरकारचे संसदीय सचिव आणि हरिजन कल्याण निगमचे अध्यक्ष बनले. जून १९९७ ते जून १९९९ पर्यंत ते हरियाणा वेअर हाऊसिंगचे अध्यक्ष होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांनी खासदार कटारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘माजी केंद्रीय राज्यमंत्री, अंबाला लोकसभा खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे आणि भाजप संघटनेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे.’ अशा शब्दात गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, अंबाला हरियाणा.