नंदुरबार : – चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालय परिसरातून फरार होण्यात मदत करणाऱ्या त्याच्या तिघां साथीदारांना नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तिघांना नंदुरबार न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ८ मे रोजी बिकानेर राजस्थान येथील ओमप्रकाश उर्फ ओमाराम किसनलाल जाट यास वाहन चोरीचा गुन्ह्यात शहादा पोलिसांनी अटक केली होती. आरोपीची न्यायालयीन कस्टडी मंजूर झाल्याने त्यास न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी घेऊन जात असताना पोलिसांना झटका देऊन व हाताबुक्यानी मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत त्याठिकाणी आधीच उभी असलेल्या विना क्रमांकाची स्कार्पिओतील इसमांशी पूर्वनियोजित कट करून पळून नेले होते. शहादा पोलिसात असई राजेंद्र पारोळेकर यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम ३५३, १२० ब, ३३३, २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
फरार आरोपींच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी चे पथक बाडमेर राजस्थान येथे रवाना झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी केसाराम उर्फ केसा मंगाराम जाट (रा. लापुंन्दडा. जिल्हा बाडमेर राजस्थान), प्रमाराम चैनाराम जाट (रा. दुधु ता. धोरीमन्ना ह. मु. रामनगर बाडमेर राजस्थान), नरपत गोवर्धनराम जाट (रा. मानपुरा बाडमेर) या तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीची स्कार्पिओ वाहन (क्र. जीजे.१७-सीए.००३५) व दहा लाख रुपये किमतीची क्रेटा वाहन (क्र.जीजे .०३-एचआर ५८९२) अशा प्रकारचे दोन वाहन जप्त केली आहेत. गुन्ह्यात सहभाग असलेले तीन जन कोलसाराम खेराजराम जाट, हेमाराम कमलेश जाट, प्रकाश जुगताराम जाट (बेनिवाल) तिघे रा. बायतू ता. बायतू जि. बाडमेर राजस्थान हे तीन आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले.
आरोपीस फरार करण्यामध्ये सहा जणांचा समावेश होता. यापैकी तिघाना अटक करून काल न्यायालयात पोलिस बंदोबस्तात हजर केले असता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तिघाना २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार