पोलीस प्रमुखांनी केला पारंपरिक बँड वादकांचा सत्कार

0
255

नंदुरबार :८/३/२०२३

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक.पी.आर.पाटील यांनी मागील वर्षी एका महत्वाच्या अभियानाची सुरुवात केली होती .

ती म्हणजे, पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त होय. सण उतसव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता.

डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपारिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

वसंत पाटील, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, आष्टे ता.जि. नंदुरबार.

गुणवंत पाटील, अध्यक्ष, श्री. छत्रपती शिवजयंती उत्सम समिती, वावद ता.जि. नंदुरबार.

प्रकाश पाटील, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, नाशिंदे ता.जि. नंदुरबार.

राजेंद्र अग्रवाल, अध्यक्ष, शिवजयंती उत्सम समिती मंडळ, शहादा.

उत्तम पाटील, अध्यक्ष छत्रपती शिवजयंती उत्सव समिती, मोहिदा त.श. ता. शहादा, यांचा समावेश होता.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सुरु केलेल्या डी.जे. व डॉल्बीमुक्त नंदुरबार जिल्हा या अभियानास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून जिल्हाभरात होणारे सर्व सण उत्सव हे डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्यांचा वापर करून साजरे होत आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या अभियानाचे हे मोठे यश मानले जात आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत,प्रमोद पवार, अति.मुख्य कार्य.अधिकारी, नंदुरबार, निता देसाई, बाल कल्याण समिती अध्यक्षा, गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृष्णा राठोड, महिला व बाल विकास अधिकारी, डॉ. तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.

सण / उत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करु नये, तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/ 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रविण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी,एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here