नेर /धुळे :१३/३/२३
प्रा.डॉ.माईसो.दिपीकाजी अनिल चौधरी राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच सोशल अँड कल्चरल असोसिएशन संस्थेच्या सन्माननीय सचिव तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सिनेट सदस्या .दिपीका अनिल चौधरी यांना निसर्ग मित्र समिती धुळे या संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आलं ..
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार महापौर प्रतिभाताई चौधरी धुळे यांच्या हस्ते देण्यात आला.
व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखाताई देवरे, महापौर प्रतिभाताई चौधरी, नगरसेवक सौ.वंदनाताई भामरे, सौ.मनिषाताई डियालानी,प्रा. डॉ. बापूसो. अनिलजी महादू चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रांमध्ये समाजपयोगी कर्तृंव करणाऱ्या 23 रणरागिणींचा सन्मान राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मित्र समिती धुळे च्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष डॉ. रेखा कुंवर यांचे राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नूतन पाटील जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड समिती धुळे यांनी केले.
तर आभार पाटील मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमाला सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबा संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ अनिल चौधरी, संस्थेचे संचालक तथा उपप्राचार्य डॉ. एम.जी. कासार, संस्थेचे संचालक पी.पी. सूर्यवंशी,आबासो.सुनिल दिगंबर पवार,सौ.छाया परदेशी, प्राचार्य डाॅ.एस.जी. बाविस्कर, मुख्याध्यापक सुरेंद्र परदेशी, संस्थेचे संचालक दादासो.गणेशजी अनिल चौधरी.. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कम॔चारी उपस्थित होते.
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज