धुळे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील धुळे जिल्ह्यातील ८० टक्के लाभार्थ्यानी ऑनलाईन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
तर अद्यापही २०% लाभार्थ्यांची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास या लाभार्थ्यांना या योजनेच्या पुढील लाभापासून वंचित रहावे लागेल, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा पीएम किसान अँपमध्ये ओटीपीव्दारे लाभार्थ्यांना स्वतः ईकेवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
तसेच ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) नाममात्र शुल्कात ईकेवायसी बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.असे संजय गायकवाड, नोडल अधिकारी, प्रधानमंत्री किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी, धुळे यांनी कळविले आहे.