ऊस वाहतूक करताना ऊस वाहतूकदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, मद्यपान करू नये, सर्व नियम पाळत ऊस वाहतूक करावी अशी माहिती आयान शुगर कारखाना या ठिकाणी ऊस वाहतूकदारांना आज नंदुरबार येथील डी वाय एस पी संजय महाजन यांनी केली.
सविस्तर वृत्त असे की
समशेरपुर येथील आयान शुगर कारखाना आहे. या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या सुमारे शेकडो वाहतूकदारांना एकत्र करून त्यांना ऊस वाहतूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील डी वाय एस पी संजय महाजन, नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक गायकवाड, कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील, ऊस विकास अधिकारी वसंत माळी, चीफ इंजिनीयर अनिल चोपडे, चीफ केमिस्ट जयसिंग पाटील,नरेंद्र गुरव व इतर कर्मचारी
आदी उपस्थित होते.
यावेळी ऊस वाहतूकदारांना रस्ते सुरक्षेतेच्या दृष्टीने वाहन चालवण्यासाठी सूचना करण्यात आली याप्रसंगी संजय महाजन यांनी सांगितले की, ऊस वाहतूक करणारे सर्व वाहन आरटीओ पासिंग असणे आवश्यक आहे, वाहनाचा पासिंग नंबर दिसला पाहिजे. ट्रॉली ट्रॅक्टर पासिंग असणे गरजेचे आहे. वाहनाचा विमा काढावा. सर्व ड्रायव्हर यांचे वाहन चालवताना लायसन असणे गरजेचे आहे. दारू पिऊन वाहन चालू नये. वाहन हे क्षमतेपेक्षा जास्त उस भरणे ओर लोड करणे हे चूकीचे आहे. ऊस बांधणीच्या दोर व्यवस्थित बांधावा, ट्रॉलीला लावलेले ड्रम व्यवस्थित असल्याची खात्री करावी, ऊस वाहनाचे टायर सुस्थितीत असेल पाहिजेत, वाहनांचा मागे रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे, वाहन चालवताना मोठ्या आवाजात स्टेप वाजवणार नाहीत याची काळजी घ्यावी, वाहन नादुरुस्त झाल्यास सुमारे शंभर फूट मीटर अंतरावर सूचना फलक लावा, रस्त्याने ऊस पडणार नाही याची काळजी घ्या, गाव, चौफुली, शाळा इत्यादी ठिकाणी वाहने हळू चालवा. आणि शाळेजवळ हॉर्न वाजवू नका. प्रशासनाचे नियम पाळा, अशा महत्त्वपूर्ण सूचना काल संजय महाजन यांनी वाहतूकदारांना दिल्यात.
त्यानंतर शेकडो वाहनांना रिफ्लेक्टर लावलेत. तसेच रेडियम असलेलं कापड बांधले,
ज्या ऊस वाहतूकदारांकडे स्वतःच वाहन चालवण्याचा परवाने त्यांच्यासाठी लवकरच कारखाना येथे शिबिर घेण्यात येईल. असे कारखान्याचे मॅनेजमेंट डायरेक्टर पद्माकर टापरे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार पद्माकर टापरे यांनी मांनले.
प्रतिनिधी: नरेंद्र गुरव प्रकाशा