Shindkheda News : शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत लावा – अन्यथा कारवाई            

0
469

Shindkheda News (प्रतिनिधी – यादवराव सावंत) –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व व्यवसायायिकांच्या दुकान व आस्थापना च्या नामफलक मराठी भाषेत असावीत असे फर्मान काढले असताना शिंदखेड़ा शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी स्वप्निल मोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांना निवेदन पदाधिकाऱ्यांनी देवुन शहरातील नामफलक मराठी भाषेत करा अन्यथा मनसे स्टाईल  आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता. त्या पाश्वभूमीवर मुख्याधिकारी यांनी जाहीर सुचना वृत्तपत्रात देवुन त्याद्वारे

शिंदखेडा शहरातील तमाम व्यावसायिकांना याद्वारे कळविण्यात येते कि, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल दि. २२ फेब्रुवारी २०२३ (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अधिसूचना) अन्वये “महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा.६१) याच्या कलम २७ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबत त्यास प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, बृहन्मुंबई महानगरपालिका, इतर सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायती, दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पासून, त्यांच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये नामफलक मराठी भाषेत असण्याशी संबंधित असणाऱ्या उक्त अधिनियमाच्या कलम ३६ क च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्ये पार पाडतील” असे आदेशित केले आहे. तसेच याअनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.२५/११/२०२३ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांच्या दर्शनी भागावर प्रथमतः ठळक व मोठ्या अक्षरात मराठी भाषेत नामफलक असावेत असा आदेश निर्गमित केलेला आहे. तरीही अद्याप शहरातील काही दुकानांवर इंग्रजी भाषेतील नामफलक दिसून येत आहेत. तरी शहरातील तमाम व्यावसायिकांनी दि.२०/१२/२०२३ पर्यंत आपले दुकान/आस्थापना यावर असलेला इंग्रजी भाषेतील नामफलक बदलून तो वरील आदेशानुसार ठळक मराठी भाषेत बदलून घ्यावा अन्यथा शासन नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी असे

मुख्याधिकारी प्रशांत बिडगर नगरपंचायत, शिंदखेडा यांनी हयाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here