पोलीस भरतीपूर्व निवड : अल्पसंख्याकानीं उपस्थित राहा : जिल्हाधिकारी खत्री ..

0
156

नंदुरबार :११/३/२०२३

अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांनी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या निवड चाचणीसाठी 15 मार्च 2023 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पोलीस शिपाई भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शिख, पारसी, जैन व ज्यु अशा अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब प्रतिष्ठांन, नंदुरबार ता.जि.नंदुरबार या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार हा शारिरीक दृष्टीने निरोगी असावा.

उमेदवाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे, याबाबत उमेदवाराने स्वयघोषित प्रतिज्ञापत्र प्रशिक्षण संस्थेकडे सादर करावे.

उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा वय 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवार हा अल्पसंख्याक (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन,शिख, पारसी, जैन व ज्यु )असावा. उंची पुरुष 165 से.मी व महिलासाठी 155 से.मी, छाती पुरुष 79 से.मी.( फुगवून 84 से.मी.असावी ) यापुर्वी उमेदवाराने शासन अनुदानित संस्थेकडून पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेतलेले नसावे.
अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला, ओळखपत्र, आधारकार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडले आवश्यक राहील.

निवड झालेल्या उमेदवारांना तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रशिक्षणादरम्यान अल्पोहार व भोजन, गणवेश ,साहित्य, पुरुष उमेदवारांकरीता दोन हॉफ पॅन्ट व दोन टी शर्ट, महिला उमेदवारांना दोन फुल पॅन्ट व दोन टी शर्ट, बुट,मोजे, बनियान देण्यात येईल.
प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या अल्पसंख्याक उमेदवारांनी 15 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल मैदान, नंदुरबार येथे कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन मनीषा खत्री यांनी केले आहे.

प्रवीण चव्हाण,जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here