पृथ्वीराज चव्हाण : कर्नाटक निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून पाहणार काम ..

0
151

सातारा -२५/४/२३

कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेसने देशातील तब्बल 40 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

मात्र, कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला कर्नाटकचा गड जिंकायचा आह
कारण, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.
म्हणूनच काँग्रेसने ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.
20 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
MD TV NEWS,सातारा जिल्हा प्रतिनिधी ,संदीप कारंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here