शहादा:2/6/23
क्रीडा प्रकारातील सर्वात महत्त्वाचा क्रीडा प्रकार मानला जाणारा कुस्ती..
या खेळातील भारताच्या सुवर्ण लेखी साक्षी मलिक विनेश फोगाट यांच्यासह सात कुस्तीपोटींवर एका खासदारांना लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप या कुस्तीपटूंनी केलेत
त्याबाबत दिल्लीतील जंतर-मंतर वरती त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे
हे आंदोलन केंद्र सरकार कुठल्या ना कुठल्या प्रकारे चिराडण्याचा प्रयत्न करते
लैंगिक अत्याचार केलेल्या या खासदाराचे नाव आहे ब्रिज भूषण
या खासदाराने लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या कुस्तीपटूंनी केला असून पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि फौजदारी खटला चालवावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सध्या दिल्लीत केली आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या आंदोलन करताना पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पुरोगामी विचाराच्या संघटनांनी एकत्र येत शहादा उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन सादर केलं
तसेच यासंदर्भात एक पत्र भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांना देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे
एकीकडे क्रीडापटूंचा अशाप्रकारे अवमान भारतात होत असेल तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो
तात्काळ अटक करून गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि या भारताच्या लेकींना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी निदर्शनकर्त्यांनी लावून धरली
नंदुरबार जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अरविंद कुवर
आदिवासी एकताचे वनसिंग पवार सुनील भिल सुभाष भिल
झुंजार फाउंडेशनचे कृष्णा कोळी वंचित बहुजन आघाडीचे गजेंद्र निकम रवी मोरे कैलास महिरे यांच्यासह फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे चुनीलाल ब्राह्मणे, रतिलालसामुद्रे अनिल कुवर, श्रमिक मुक्ती दलाच्या रंजना कान्हेरे, सुनील शिरसाट विनोद पावरा विक्रम कान्हेरे प्रदीप निकम संतोष महिरे विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहाद्यात एकत्र येत या संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित लैंगिक शोषण करणाऱ्या या खासदारावर कारवाई करावी ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे..
संजय मोहिते ,शहादा प्रतिनिधी..