सकारात्मक पत्रकारितेतून चांगली पत्रकारिता घडवा – जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर..

0
154

नंदुरबार जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाची शहाद्यात पार पडली बैठक

शहादा तालुकाध्यक्षपदी पत्रकार रुपेश जाधव यांची नियुक्ती

शहादा /नंदुरबार -१७/४/२३

पत्रकारांनी आपल्यातील मतभेद विसरून एक संघ येऊन सकारात्मक दृष्टीने पत्रकारिता करावी. सकारात्मक पत्रकारितेतून देखील चांगली पत्रकारिता करता येऊ शकते याची अनेक उदाहरणे आहेत. देशासह १८ राज्यांमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे.

म्हणून कुणी कुठल्याही संघटनेत काम करत आहे हे न पाहता व्हाईस ऑफ मीडियामध्ये सर्वच पत्रकारांनी सहभागी होऊन सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याला साथ द्यावी, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर यांनी केले.

या बैठकीत शहादा तालुका कार्यकारणीच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे शहादा तालुका प्रतिनिधी रुपेश जाधव यांची निवड करण्यात आली.

शहादा येथील पटेल रेसिडेन्सीत व्हाईस ऑफ मीडियाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी व शहाद्यातील पत्रकारांची बैठक आज दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली.

या जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रा.दत्ता वाघ, संजय राजपूत, रमाकांत पाटील, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस राकेश कलाल, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब राजपूत, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजू पाटील, साप्ताहिक विंगचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार उपस्थित होते.

या बैठकीला व्हॉईस ऑफ मीडियाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसह नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव येथील तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व शहाद्यातील पत्रकार बांधव असे एकूण 45 जण उपस्थित होते.
या बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत पत्रकार कै. रवींद्र चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

6 3
व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व शहाद्यातील पत्रकार बांधव..

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी यांनी प्रास्ताविकेतून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या कार्याची विस्तृतपणे माहिती दिली. तसेच पत्रकार प्रा.दत्ता वाघ, संजय राजपूत, रमाकांत पाटील, विष्णू जोंधळे, जगदीश जयस्वाल, अनिल जावरे, विजय पाटील, सचिन जळोदकर, प्रा.आय.जी.पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर म्हणाले की, पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात.
काही पत्रकार केवळ पत्रकारितेवर अवलंबून आहेत.

प्रखर पणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची गळचेपी होण्याचे प्रकार देखील घडत असतात याचे दाखले देत योगेंद्र दोरकर पुढे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडिया ही देशभरातील पत्रकारांसाठी सकारात्मक दृष्टीने काम करणारी संघटना आहे.
सकारात्मक पत्रकारितेतून देखील चांगली पत्रकारिता करता येऊ शकते.

पत्रकारांचे हित व लढ्यासाठी ही काम करणारी संघटना आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

कारण पत्रकारिता करतांना प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांकडून दुजाभावही केला जातो. अशा वेळी पत्रकारांवर संकट आल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम व्हाईस ऑफ मीडिया या संघटने कडून होणार आहे.

कुठलाही पत्रकार जिल्हा अथवा तालुका स्तरावरील इतर संघटनांमध्ये असले तरी त्यांनी व्हॉईस ऑफ इंडिया या सकारात्मक दृष्टीने काम करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेत सक्रियपणे सहभाग व्हावे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे एक तरुण नेतृत्व असून देशभरातील पत्रकारांना एकजूट करण्याचे काम या संघटनेमार्फत ते करीत आहेत, असे सांगून योगेंद्र दोरकर यांनी शहादा तालुका कार्यकारिणी कडून अपेक्षित पणे कार्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
तसेच या बैठकीत शहादा तालुका कार्यकारणीच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे शहादा तालुका प्रतिनिधी रुपेश जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्षपदी राजू पाटील व साप्ताहिक विंगचे नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सुभाष कुंभार यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी केले. आभार व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस राकेश कलाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाची नंदुरबार जिल्हा कार्यकारणी व नंदुरबार तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रविण चव्हाण एम. डी. टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

pravin chavhan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here