नंदुरबार :१६/३/२३
सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी 14 मार्चपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला..
त्याला नंदुरबार जिल्ह्यात तलाठी संघटनेने पाठिंबा दर्शवला..
राज्यभर 14 मार्चपासून सुरू झालेल्या बेमुदत संपामुळे सर्व सेवा कोलमडल्या आहेतच परंतु सरकारी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसलं..
हेही चित्र पहावयास मिळालं नंदुरबार शहरातील तहसील कार्यालयात तलाठी संघटनेचे..
तलाठी संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत मागणी लावून धरली ती जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्याची…
पाहूया कर्मचाऱ्यांची ही घोषणाबाजी
तलाठी संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते…
ठिकठिकाणी संप मोर्चे या माध्यमातून आपली मागणी कायम ठेवण्यासाठी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळालं..
एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप मात्र दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयांमधील शुकशुकाट आणि तिसरीकडे सर्वसामान्यांचे होणारे यातून हाल हा त्रिकोण सध्या अनुभवास मिळत आहे..
शासन स्तरावर ताबडतोब या मागण्या मान्य होतील आणि सर्व व्यवस्था पूर्वपदावर सुरळीत होईल, आणि कर्मचारी प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करतील हीच अपेक्षा..
जीवन पाटील कार्यकारी संपादक, एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार