नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील आहे हा गणेश …
मुंबई /नंदुरबार -७/७/२३
अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा ,किनारा तुला पामराला..कवी कुसुमाग्रज्यांच्या या ओळी मला आठवल्या .. कारण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. असे भावनिक उद्गार दिव्यांग चिमुकला गणेशला भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढले …



हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. तसेच जेवणे, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी मला दिली. यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई/नंदुरबार