तळोदा /नंदुरबार : १८/५/२३
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांसाठी आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने आज दि.१७ मे (बुधवारी जनता दरबार) आयोजित केला.
पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अप्पर पो.अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पो.अधिकारी संभाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनता दरबार पार पडला.
या जनता दरबारात 116 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
एका ज्येष्ठ महिलेच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन जनता दरबारास सुरुवात झाली.
सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी पो.अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या सुचनेवरुन तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रांगणात बुधवारी सकाळी 10 वाजता जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर पो.अधिक्षक पी.आर.पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांना गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर असते.
मात्र एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात.
काहीवेळेस दिलेल्या फिर्यादची नक्कल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अशा छोट्या छोट्या कामांसाठी संबंधित पोलीस कर्मचारी यांची भेट न होणे त्यामुळे पोलीस आणि सर्वसामान्य जनतेतील अंतर कमी होण्याची मदत या जनता दरबारामुळे होते.
यावेळी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जनता दरबारात सांगितले की, जनता दरबाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त तक्रारीचा निपटारा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न बीट अंमलदराच्या मदतीने, तसेच दिवाणी खटलेही दोघे पार्टीला विश्वासात घेऊन निकाली काढण्याचा प्रयत्न करु.
तुमच्या समस्या/तक्रारी ऐकुन कायदेशीर कारवाई व समुपचाराने निपटारा करण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले आहे.
त्याप्रमाणे जागेवरच संबधित अधिकाऱ्यांना सुचना देऊन निपटारा केला.
कौटुंबिक वाद, शेजारच्यांविरुद्ध तक्रारी, हाणामारीचे अदखलपात्र गुन्हे, पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्यात आले.
जनता दरबारात आलेल्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स.पो. निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलिसांनी परिश्रम घेतले.
नितीन गरुड.. तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज