भिंतीला होल पाडून 1 लाख २२ हजारांचा मुद्देमाल लंपास punching a hole in the wall stolen 22,000 worth of goods

0
2056

नवापूर/ खांडबारा : खांडबारा येथे मोबाइल दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख २२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (punching a hole in the wall stolen 22,000 worth of goods)

punching a hole in the wall stolen 22,000 worth of goods

खांडवा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या आयशा मोबाइल दुकानाच्या मागील भिंतीला मोठे छिद्र पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे उघड झाले आहे. दुकानात शिरल्यांतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याचे दिसून आले.

– हेही वाचा –

त्यानंतर गल्ल्यातील ३७ हजार रुपये रोख व सहा मोबाइल असा एकूण एक लाख २२ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून घेत पोबारा केला. सकाळी दुकानमालक अतीक शेख दुकानात गेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी लागलीच खांडबारा दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. विसरवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे व स्थानिक गुन्हे शाखेने विभागाच्या फिंगरप्रिंट व श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

याबाबत अतीक शेख यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– हेही वाचा –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here