नंदुरबार : १/६/२३
भवर ता.तळोदा येथे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती.साजरी करण्यात आली
कठीण प्रसंगात खचुन न जाता धीरोदात्तपणे राज्यकारभार करून एक सर्वोत्तम राज्यकर्ता, कुशल प्रशासक म्हणुन युगानुयुगे अनेक पिढयांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हि ओळख आजही कायम आहे
त्यांच्या जयंतीनिमित्त भवर ता. तळोदा येथे लोकनियुक्त सरपंच श्री. श्रीकांत पाडवी यांनी अंगणवाडी सेविकांचा सन्मान केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
श्रीमती शेवंती बाई हिरालाल पाडवी आणि श्रीमती सुरेखाबाई मनीलाल वसावे यांची अविरत सेवा निमित्ताने आजच्या दिवशी त्यांना सन्मानपत्र व अहिल्यादेवी ट्रॉफी तसेच पाचशे रुपये देऊन त्यांना सन्मानित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
तसेच भवर गावातील महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
श्रीकांत पाडवी यांनी अहिल्यादेवी होळकरांची गौरव गाथा जमलेल्या महिलांना सांगितली.
अंगणवाडी सेविकांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नितीन गरुड ,ग्रामीण प्रतिनिधी ,तळोदा