शिंदखेडा :१८/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 या दोघीजणी होत्या शिंदखेडा येथील नणंद भावजयि
2 धार्मिक प्रवचन ऐकण्यासाठी जात होत्या सिहोरला
3.. अर्ध्या रस्त्यातच काळाने घातला दोघींवर घाला
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील ननंद भावजई यांचा नुकताच मध्य प्रदेशातील देवास बायपासवर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.. त्या निघाल्या होत्या रुद्राक्ष घेण्यासाठी..
पहा हि सविस्तर बातमी :https://youtu.be/5ZhcMpYS9rs
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जातात.
ते मध्य प्रदेशातील सीहोर येथे.. या दोघीजणी देखील रुद्राक्ष घेण्यासाठी या कथेत सहभागी होण्यासाठी निघाल्या होत्या… अर्ध्या वाटेतच 15 रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील देवाच बायपास रोड लगत अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..
रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली..
आणि तिथेच त्यांची रुद्राक्ष घेण्याची मनोकामना अर्धवट राहिली.. आणि त्यांची जीवन रेषा संपली..
नणंद सुनंदाबाई मिस्तरी वय वर्ष 45 या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळं शिंदखेडा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवल कढरे तालुका प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही न्यूज शिरपूर