रघुवंशी परिवाराच्या दातृत्वातून पालिकेला दोन शववाहिनी सुपूर्द

0
296

नंदुरबार :- शहरातील रघुवंशी परिवार नेहमीची सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. त्यात शहराचे नेते चंद्रकांत राघुवंशी हे राजकारणासोबत सामाजिक दातृत्वातून जनतेशी आपली बांधिलकी जोपासत असतात. अशाच सामाजिक दातृत्वातून श्री रघुवंशी यांनी नंदुरबार पालिकेला दोन शववाहिनी सुपूर्द केल्या आहेत. मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे. यासाठी नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र पालिकेला दोन शववाहिन्या उपलबद्ध झाल्याने समस्यां सुटण्यास मदत होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

40357eda 1e36 478c a73f aeb7c72375a4

माजी आमदार,लोकनेते स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व.विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ शवपेटी पालिकेस देण्यात आली. रघुवंशी परिवाराने सामाजिक दातृत्वातून माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार पालिकेस दोन शववाहिनी दिल्याने पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी चंद्रकांत रघुवंशी यांचे आभार व्यक्त केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक परवेज खान, गजेंद्र शिंपी, फारूक मेमन, जगन माळी, चेतन वळवी, प्रीतम ढंडोरे, हिरालाल चौधरी, फरीद मिस्तरी, अतुल पाटील, प्रमोद शेवाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रेम सोनार, शहर संघटक पंकज चौधरी, संजय माळी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते..

प्रविण चव्हाण. एम.डी.टी.व्ही.न्यूज नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here