रायगड :२१/७/२३
सलग दुसऱ्या दिवशी काय आहे इर्शाळवाडीची स्थिती? अडथळे असले तरी कसं सुरू आहे ..पाहा PHOTO..डोक्यावर पाऊस आणि अनेक अडचणी तरीसुद्धा अविरतपणे NDRF चे जवान कामाला लागले आहेत.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0





इर्शाळवाडी इथे दरड बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली होती. त्यानंतर बुधवारी पहाटेपासून इथे NDRF ची टीम बचावकार्य करत आहे.आज बचावकार्याचा दुसरा दिवस आहे. साधारण 60 एक जण अडकल्याचं सांगितलं जात होतं.आता NDRF चे जवान अक्षरश: हाताने, फावड्याने ढिगारा बाजूला करुन शोध घेत आहेत.
तिथली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. लोकांचा आक्रोश आहे. कुणीचे आई वडील तर कुणाचे सासू सासरे तर कुणी मुलं तर कुणीच्या नंडा भावजया या दुर्घटनेत गेल्यानं ग्रामस्थांचा मोठा आक्रोश तिथे पाहायला मिळत आहे.
काल संध्याकाळपर्यंत 16 मृतदेह सापडले होते. आता आज पुन्हा बचावकार्य सुरू आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, इर्शाळवाडी,रायगड ..