रायगड :२१/७/२३
दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा, तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उपलब्ध होणारी साहित्य सामुग्री, जखमींवर उपचाराची सुविधा देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अचानक काही मदत लागल्यास ‘फ्लड लाईटस’ लावण्यात आले आहेत. महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके १५० मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी , स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रपचे प्रतिनिधी असे सुमारे ७०० जण मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक १९८ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली आहे. पावसामुळे दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे. विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,इर्शाळवाडी ,रायगड ..