Today Dhule News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठवलेली श्रीरामाची मूर्ती अनुलोमचे वस्ती मित्र संतोष ईशी यांना भेट..!

0
178
shri-rama-idol-sent-by-deputy-chief-minister-fadnavis-today-dhule-news

धुळे ( Today Dhule News ) तालुक्यातील नेर येथील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठवलेली श्रीरामाची मूर्ती अनुलोमचे वस्ती मित्र संतोष ईशी यांना भेट देण्यात आली आहे.

तसेच रात्री अप रात्री सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात आणि शासनाच्या योजनांची जनजागृती व लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी कार्यरत असलेले नेर येथील अनुलोमचे वस्ती मित्र संतोष ईशी यांना अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम) चे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत पाठवण्यात आलेली श्रीरामाची मूर्ती भेट देण्यात आली. गावातील श्रीराम मंदिरात कार्यक्रम झाला.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम) चे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याला 32 श्रीराम मूर्तिचे वितरण करण्यात आले आहे. त्यासोबत प्रत्येक वस्ती मित्राला देवेंद्र फडणवीस यांनी लेहिलेल पत्र ही देण्यात येत आहे. गेल्या 2016 पासून अनुलोम मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम अनुलोमचे वस्ती मित्र करत असतात, म्हणून त्यांना श्रीरामाची मूर्ती देण्यात आली. ( Today Dhule News )

shri-rama-idol-sent-by-deputy-chief-minister-fadnavis-today-dhule-news

त्यात नेर येथील संतोष ईशी यांना धुळे ग्रामीण भागचे जनसेवक गोपाल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गावातील श्री राम मंदिरात श्रीरामांची मूर्ती प्रदान करण्यात आली.यावेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,मनिष जोशी,पत्रकार सुरज खलाणे,संजय कपुर,फुला पाटील,पंकज वाघ,महेश पाटील,ललीत गुरव,पंकज अहीरे,संजय जोशी,अरुण शेलार,दिनेश सोनवणे,अविनाश चौधरी,राकेश अहिरे,सागर माळी,चेतन भंडारी आदी रामभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल अशी प्रतिक्रिया संतोष ईशी यांनी व्यक्त केली. ( Today Dhule News )
✍🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here