Sarangkheda :८०० किलोमीटरची घोडस्वार करीत गाठले सारंगखेडा

0
242

Sarangkheda – उच्च विद्या विभूषित युवकांनी ८०० किलोमीटरची अश्वरपेट
करुन गाठले सारंगखेडा.गावाचा वेशीवर जंगी स्वागत.

सारंगखेडा प्रतिनिधी – गणेश कुवर ता.२३ : हैदराबाद ते सारंगखेडा अशी ८०० किलोमीटरची घोडेस्वारी करत १५ दिवसांत तिघा उच्चशिक्षित तरुणांनी आज (ता.२३) चेतक फेस्टिवल गाठले. सारंगखेडा गावाचा वेशीवर चेतक फेस्टिव्हलचे प्रमुख जयपालसिंह रावल व नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करुन चेतक फेस्टिव्हल पर्यंत वाजत गाजत मिरवणुकीने आणण्यात आले.या अश्व रपेटची निश्चितच इतिहासात नोंद होणार.

सारंगखेडा (ता. शहादा)येथील श्री एकमुखी दत्त यात्रेला २६ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. येथील इतिहासकालीन अश्व बाजार नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यत भल्या भल्यांना भुरळ घालणारा आहे. येथील अश्व बाजाराचा मोह या तिघा तरुणांनाही आवरता आला नाही. हैदराबाद ते सारंगखेडा सुमारे ८०० किलोमिटर चे अंतर घोडयावर पार करत चेतक फेस्टिवलसाठी हैदराबाद येथील तीन जण दाखल झाले आहेत. ही एक ऐतिहासिक घटना होणार असून त्याची नोंद देखील घेतली जाईल.
हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथून (ता. ९) डिसेंबर ला तिघे युवक निघाले. त्यातील डॉक्टर चेतन कुमार हे एमडी जनरल मेडिसिन असून एम. फिल. पिलानी येथे करत आहेत. दुसरे शिवकुमार हे अमेरिका स्थित आयटी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. तिसरे सहभागी युवक नरेंद्र राजू हे असिस्टंट डायरेक्टर आणि मॅथेमॅटिक्स चे लेक्चरर आहेत. चेतक महोत्सव व अश्वांची माहिती जनतेला व अश्वशौकीनांना कळावी याचा इतिहास युवा पिढीला माहीती व्हावा . म्हणून हैदराबाद ते सारंगखेडा हे ८०० किलोमीटर अंतर अश्वावर स्वार होऊन अश्वभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला . येतांना ५० किलोमिटर अंतर चालल्यानंतर विश्रांती घेतली . त्यानंतर पुन्हा प्रवास सुरु केला.अशा प्रकारे ( ता .२३) पर्यंत सारंगखेडा गाठले. सारंगखेडा येथे दाखल झाल्यानंतर गांव सिमेवर तिघां अश्व प्रेमिंना अश्वांसह जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी
चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल ,उप
विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार , सरपंच पृथ्वीराज रावल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी , चेतक समितीचे आयोजक प्रणवराजसिंह रावल , विनित गिरासे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

उच्चविद्याविभूषित युवकांचे अश्वप्रेम ……

यातील एक तरुण अमेरिकेत एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर, दुसरा तरुण गणिताचा लेक्चरर आणि असिस्टंट डायरेक्टर, तर तिसरा युवक एमडी मेडिसिन झालेला असून उच्च विद्यापीठात डॉक्टर आहे.
अशा या उच्चविद्याविभूषित युवकांचे अश्वप्रेम अधोरेखित होते आणि ८०० किलोमीटरची यात्रा करत ते चेतक फेस्टिवल साठी सारंगखेडा येथे पोहोचले आहेत. त्यांचे स्वागत चेतक फेस्टिव्हलचे सर्वेसर्वा जयपालसिंह रावल यांनी नंदुरबार जिल्हावासीयां तर्फे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here