RELIGIOUS:न्याहळोद गावात संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी संपन्न

0
335

न्याहळोद /धुळे -१६/७/२३

धुळे तालुक्यातील न्याहाळोद संत शिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव नामदेव दामा रेळेकर असे होते. त्यांच्या आईचे नाव गोणाई. जातीने शिंपी होते.त्यांच्या जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते. संत जनाबाई व संत चोखामेळा हे नामदेवांना गुरु मानत. ते वारकरी संप्रदायातील संत कवी होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत केला. त्यांच्या अभंग गाथेत सुमारे २५०० पेक्षा अधिक अभंग आहेत. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी या उक्तीनुसार त्यांनी आजीवन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ३जुलै १३५० रोजी त्यांनी समाधी घेतली.

हे हि वाचा :नेर जि प शाळा : विद्यार्थ्यांनी अनुभवलं चांद्रयान 3 प्रक्षेपण

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
शिंपी समाजाच्या वतीने न्याहाळोद ता. जि.धुळे येथे शनिवार दिनांक १५/७/२०२३ रोजी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी आनंदात साजरा करण्यात आली. न्याहाळोद गावात शिंपी समाजाचे फक्त १० ते १५ कुटुंब राहतात. असा स्तुत्य उपक्रम सतत १७ वर्षापासून नियमित करतात. सकाळी ९.०० वाजता प्रतिमा पूजन ९.३०ते१२ वाजेपर्यंत वारकरी भजनी मंडळाचा कार्यक्रम१२.०० वाजता आरती होते. नंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम होतो. आयोजकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम केला. त्यामुळे संपूर्ण न्याहाळोद गावात आनंदाचे वातावरण तयार झाले होते.

दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here