ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

0
168

नंदुरबार :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी दिली आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

शुक्रवार १६ जून २०२३ रोजी आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. बुधवार २१ जून २०२३ रोजी विशेष ग्रामसभा बोलवून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. शुक्रवार २३ जून २०२३ रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब ) जिल्हाधिकारी मान्यता देतील.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सोमवार २६ जून २०२३ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार २७ जून २०२३ ते सोमवार ३ जुलै २०२३ या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. शुक्रवार ७ जुलै २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्यात येईल.

बुधवार १२ जुलै २०२३ रोजी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. तर शुक्रवार १४ जुलै २०२३ रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्ध देण्यात येईल. असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) श्री.दाणेज यांनी कळविले आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here